देवचंद कॉलेजच्या सायबर वॉरियर्सनी अर्जुनी गाव “महाराष्ट्रातील पहिले सायबर शिक्षित गाव” बनविले

देवचंद कॉलेजच्या सायबर वॉरियर्सनी अर्जुनी गाव “महाराष्ट्रातील पहिले सायबर शिक्षित गाव” बनविले
सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद कॉलेज, अर्जुननगर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रमांतर्गत सायबर शिक्षित गाव प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अर्जुनी गावाची “महाराष्ट्रातील पहिले सायबर शिक्षित गाव” म्हणून घोषणा करण्यात आली. मा. डॉ. जॅस्मिन यांच्या हस्ते अर्जुनी गावाला सायबर शिक्षित गाव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा. डॉ. जॅस्मिन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत अर्जुनीला सायबर शिक्षित गावाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की इंटरनेटचा वापर करताना तो सुरक्षित पणे करा आणि आपल्या पुढील पिढीला सक्षम बनवा असे आवाहन केले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. अनुपमा काटकर, अध्यक्षा, क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांनी सायबर वॉरियर्सचे खूप कौतुक केले आणि आजकाची पिढी काय करू शकते याचे उत्तम उदाहरण आज आमच्या वॉरियर्सनी दाखवून दिले असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास श्री. कुलदीप बोंगे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती कागल; श्री. अजय शिर्के, असोसिएट डायरेक्टर, क्विक हील फाऊंडेशन; श्री. अनिकेत कुडले, पोलीस उपनिरीक्षक, मुरगूड; प्रा. डॉ. आर. एम. साळुंखे, प्रभारी प्राचार्य, देवचंद कॉलेज; डॉ. ए. एस. डोनर, उपप्राचार्य देवचंद कॉलेज; श्री. जे. एन. सातवेकर, प्रशासक, ग्रामपंचायत अर्जुनी; श्री. प्रवीणसिंह सुळकुडे, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
“सायबर शिक्षित गाव” या उपक्रमात देवचंद कॉलेजचा सायबर वॉरियर क्लब आणि क्लबमधील रुद्र सुतार, प्राजक्ता खबरे, मधुरा पुंडे, प्रतीक्षा naik, सुजल पाटील, श्रावणी पाटील, साक्षी जाधव, ज्ञानश्री दळवी, अश्विनी मुळीक, वसुधा खोत, श्रावणी कावळे, पुजा जंगम, पल्लवी विजय पाटील, पल्लवी सतीश पाटील, पायल जाधव, चंदना मोरे, सानिका राणगे, वैष्णवी सुतार, प्रणोती सुतार, योगिता निकडे या सर्व वॉरियर्सची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. या उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, मा. श्री. आशिषभाई शाह आणि उपाध्यक्षा तृप्तीभाभी शाह नाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुरा पुंडे आणि कु. ज्ञानश्री दळवी यांनी केले. तर कु. प्रणोती सुतार हिने सायबर सुरक्षित गीत सादर केले.
“सायबर शिक्षित गाव” संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये प्रा. प्रशांत सुभाष कुंभार, कॉर्डिनेटर – सायबर वॉरियर क्लब, देवचंद कॉलेज यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनीच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
“सुरक्षित नागरिक – सुरक्षित डिजिटल व्यवहार – सायबर शिक्षित अर्जुनी” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रामपंचायत अर्जुनीच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
