दारवाड येथे अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे लाखोंचे नुकसान :

दारवाड येथे अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे लाखोंचे नुकसान :
सिंहवाणी ब्युरो / दारवाड
मौजे दारवाड ता. भुदरगड येथील उदय अण्णासो पाटील यांची एक एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली आहे. प्रचंड मेहनत, अपार कष्ट, आधुनिक तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन असे अनेक प्रयत्न त्यांनी करून केळी बागेचे संगोपन केले होते . हा प्लॉट काढण्यासाठी अवघे १५ दिवस ते एक महिना बाकी असताना अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण प्लॉट जमीनदोस्त झाला. त्यामुळे हे शेतकरी निसर्गासमोर हातबल झालेले आहेत.
या नुकसानग्रस्त क्षेत्राचे कृषी विभागामार्फत पंचनामा केला गेला. याप्रसंगी कृषी सहाय्यक अधिकारी श्री. कृष्णात एकल, ग्रामसेवक श्री. पी.डी. कांबळे , तलाठी सौ. वर्षा गुरव ,शेती मित्र महाराष्ट्र शासन श्री. शरद देवेकर ,शेतकरी श्री. उदय अण्णासो पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.
हा प्लॉट माझ्या मार्गदर्शनाखाली होता. १ एकर क्षेत्रामध्ये जवळपास १२०० झाडे लावली होती. सरासरी प्रत्येकाच्या केळी घडाचे वजन 50 ते 55 किलो अपेक्षित होते. अंदाजे ६०टन उत्पादन आवश्यक होते. आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे १३ ते १४ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.तरी शासनाने योग्य ती कारवाही करून संबंधित शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. शरद देवेकर
शेती मित्र महाराष्ट्र शासन
