क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वागदरी येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून : आरोपी पोमाजी याला पोलिसांनी केली केवळ २४ तासात अटक

वागदरी येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून

आरोपी पोमाजी याला पोलिसांनी केली केवळ २४ तासात अटक

सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, सोलापूर
अनैतिक संबंधातून वागदरी येथे महिलेचा आज परमेश्वर पोमाजी याने खून केला होता. या खुनाचा
२४ तासात पोलिसांनी लावला छडा लावला आणि आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून वागदरी येथे महिलेचा खून करण्यात आला होता. पोलिसांच्या या तात्काळ तपासाचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदन केले जात आहे.
वागदरी येथील महिलेच्या खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; लावून आरोपीला अटक करण्यात आली, असल्याची अक्कलकोट पोलिसांची ही पहिलीच मोठी कामगिरी ठरली आहे.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने वागदरी येथील महिलेच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या जलद आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



दि. ६ जुलै रोजी वागदरी गावच्या शिवारातील शेतातील पडलेल्या विहिरीत ५१ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी हा अपघात असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान महिलेची ओळख लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव (वय ५१, रा. वागदरी, ता. अक्कलकोट) अशी पटली. त्या अक्कलकोट येथील एका हॉटेलमध्ये काम करत होत्या. पोलिसांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची कसून चौकशी केली.

तपासात परमेश्वर सिद्धराम पोमाजी (रा. वागदरी) याच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान त्याने जुन्या वादातून महिलेचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह शेतातील पडलेल्या विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.



या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व २३८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


मृत व्यक्ती: लक्ष्मीबाई जाधव (रा. वागदरी, ता. अक्कलकोट)
आरोपी : परमेश्वर सिद्धाराम पोमाजी (रा. वागदरी) — महिलेचा प्रियकर

घटना : आरोपीने महिलेकडून होणाऱ्या सततच्या वाद आणि त्रासाला कंटाळून तिचा गळा दाबून खून केला. नंतर मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातील विहिरीत फेकला.

पोलिस कारवाई : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४०२/२०२६ दाखल. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संतोष पांढरे, गणेश अंगुले, महेश कोळी, श्रावणी गंगणे, दीपक शेळके, राहुल राऊत, सुनील सुरवसे, श्रीकांत ढवळे, संदेश मुगुळे, विजय महाडिक, विकास पवार, कांबळे व गोवर्धन मुलाणी यांचा समावेश होता. पोलिसांच्या तत्पर आणि वेगवान तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला, ही बाब कौतुकास्पद आहे. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.


अक्कलकोट तालुक्यांतील वागदरी येथील अक्कलकोट रोड वर असलेल्या हॉटेल सिद्धगंगा चामालक परमेश्वर पोमाजी हा मोठ्या अनैतिक व्यवसायात गुंतला होता त्याच्या हॉटेल मध्ये मयत लक्ष्मी जाधव या स्वयंपाकीण म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कामास होत्या या महिलेसोबत हॉटेल सिद्धगंगा चा मालक परमेश्वर पोमाजी याचे अनैतिक संबंध होते या महिलेला तो फुकट मध्ये वापरत होता कामाचे देखील पैसे तो महिलेस देत नव्हता यामुळे ती कामाच्या पैशाची मागणी करू लागली की पोमाजी तिला मारहाण करून जीवे मारण्याची वारंवार धमकी देखील होता.


हॉटेल सिद्धगंगा चा मालक परमेश्वर पोमाजी हा हॉटेल च्या नावाखाली कर्नाटक आणि गोवा येथील मद्य विक्री करत होता गुटखा आणि हातभट्टी दारू व गांजाची देखील तो विक्री करत होता अशी चर्चा वागदरी गावात आणि परिसरातील लोकांमध्ये सुरु असल्याचे कळते.



हॉटेल सिद्धगंगा हे अक्कलकोट रोड वर असल्यामुळे ते रात्रंदिवस सुरू राहत असे यामुळे येथे पिणारे गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणात येत असत इतकेच नाही तर तो हॉटेल च्या गच्चीवर क्लब आणि जुगार ही चालवत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button