ग्रामविकासाच्या अभ्यासाला पीएच.डी.ची मोहोर! प्रसाद झोरे यांना राज्यशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी; भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

ग्रामविकासाच्या अभ्यासाला पीएच.डी.ची मोहोर!
प्रसाद झोरे यांना राज्यशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी; भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा
सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या ग्रामविकास विभागांतर्गत पंचायत समिती गगनबावडा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रसाद यशवंत झोरे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून राज्यशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे. शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशामुळे भुदरगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या पायाभूत विकासाच्या योजनांचा अभ्यास’ या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अभ्यास आणि त्यांचे महत्त्व या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
झोरे यांनी यापूर्वी राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांत सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच राज्यशास्त्र, कृषी, उद्यानविद्या आणि लोकप्रशासन या विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. विविध विषयांतील शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय सेवेतील अनुभव यांचा संगम त्यांच्या या यशातून दिसून येतो.
या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. शार्दुल सेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. प्रसाद झोरे हे भुदरगड तालुक्यातील सालपेवाडी येथील रहिवासी असून डॉ. शिवाजी झोरे यांचे पुतणे आहेत. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असताना संशोधनाच्या माध्यमातून उच्च शैक्षणिक यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
शासकीय सेवा, अभ्यास आणि संशोधन यांचा समतोल साधत मिळविलेली ही पीएच.डी. पदवी निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
✍️ संपादक : किशोर आबिटकर
सिंहवाणी लाईव्ह न्यूज