श्री शाहू कुमार भवन यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची हत्तीवरून मिरवणूक

श्री शाहू कुमार भवन यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची हत्तीवरून मिरवणूक
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:
श्री मौनी विद्यापीठ गारगोटी संचलित श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशालेच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराजांच्या 152 व्या जयंतीनिमित्त वेशभूषेतील राजर्षी शाहू महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आलीया मिरवणुकीचे उद्घाटन श्री मौनी विद्यापीठाचे चेअरमन श्री मधुकर देसाई शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण कर्मचारी प्रतिनिधी श्री अरविंद चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना मुख्याध्यापक डॉ. श्री एस बी शिंदे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भुदरगड परिसराचे असलेले नाते स्पष्ट केले भुदरगड पंचायत समिती येथे या मिरवणुकीचे स्वागत गारगोटीचे सरपंच श्री प्रकाश वास्कर यांनी केले भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांनी श्री शाहू कुमार भवन च्या या उपक्रमाचे कौतुक केले व मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांचे अभिनंदन केले यावेळी पर्यवेक्षक डी एल सावंत तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता