क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमात देवचंद कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसरपदी निवड

क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमात
देवचंद कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसरपदी निवड
सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद कॉलेज, अर्जुननगर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत संगणकशास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची क्विक हील फाउंडेशन, पुणे तर्फे क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. क्लब ऑफिसर म्हणून निवड झालेलले ०४ विद्यार्थी व १६ सायबर वॉरियर्स असे एकूण २० विद्यार्थी ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
संगणकशास्त्र विभागातील कु. रुद्र सुतार (प्रेसिडेंट), कु. ज्योती भोंगाळे (सेक्रेटरी), कु. मधुरा पुंडे (कम्युनिटी डायरेक्टर), कु. प्रतीक्षा नाईक (मीडिया डायरेक्टर), आणि प्रा. प्रशांत कुंभार (समन्वयक) यांच्यावर या उपक्रमाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे ऑफलाईन ट्रेनिंग ओरीएंटेशन विमाननगर (पुणे) येथील कंपनीच्या ऑफिसमध्ये पार पडले. ट्रेनिंगसेशन दरम्यान श्री. अजय शिर्के, सौ. गायत्री केसकर-पवार आणि श्री. दिपू सिंग व त्यांचे सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. कंपनीच्या अध्यक्षा सौ.अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबरोबरचं ऑनलाईन जीवनात सायबर गुन्हेगाराच्या संख्येत मोठी वाढ होत आहे आणि त्यासाठीच देवचंद कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. या चार ऑफिसरच्या नेतृत्वात १६ सायबर वॉरियर्स महाविद्यालय परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच समाजातील विविध घटकांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहेत.
या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, मागील तीन वर्षात या उपक्रमात अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. मागील वर्षी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. आशिषभाई शाह, आणि उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आर. एम.साळुंखे व संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. स्वप्नील पोतदार यांचे मार्गदर्शन मिळाले.