आजरा तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ पिकांचे नुकसान; जेसीबी ला धडक, ट्रॅक्टर ट्रॉली उलटली

आजरा तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
पिकांचे नुकसान; जेसीबी ला धडक, ट्रॅक्टर ट्रॉली उलटली
गडहिंग्लज प्रतिनिधी
पोळगाव व एरंडोळ येथे गेले तीन दिवस हत्तीने धुमाकूळ घातला असून हत्तीने संभाजी बाळू नार्वेकर या पोळगाव येथील शेतकऱ्याच्या रहात्या घराजवळ उभा केलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी केली तर जवळच उभ्या असणाऱ्या जेसीबीला जोरदार धडक देऊन जेसीबीच्या काचाही फोडून टाकल्या आहेत
गेले तीन दिवस हत्तीचा या भागातील शेती पिकामध्ये धुमाकूळ चालू आहे. येथील राजू होलम, दशरथ होलम यांच्या गट नंबर ११८ मधील ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर भीमराव विठोबा चौगुले यांच्या उसाचेही नुकसान केले आहे.
बळीराजा खरिपाच्या तयारीत असतानाच हत्तीने जोरदार धुमाकूळ घातल्याने शेतीकामाकरीता शेताकडे जायची की नाही ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
गडहिंग्लज उपविभागातील आजरा चंदगड तालुक्यात हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त बनले आहेत.