जिल्हाताज्या घडामोडी

ईव्हीएम’ मशीनद्वारे गारगोटी हायस्कूल व समर्थ ज्युनिअर कॉलेजची जिमखाना निवडणूक : कृतार्थ वैद्य जनरल सेक्रेटरी तर प्रगती पाटील विद्यार्थिनी

​’ईव्हीएम’ मशीनद्वारे गारगोटी हायस्कूल व समर्थ ज्युनिअर कॉलेजची जिमखाना निवडणूक


कृतार्थ वैद्य जनरल सेक्रेटरी तर प्रगती पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचा उत्साह!


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेची जाणीव निर्माण व्हावी, निवडणूक पद्धती आणि मतदानाचे महत्त्व समजावे यासाठी गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर कॉलेज येथे चालू शैक्षणिक वर्षाची जिमखाना निवडणूक अत्यंत उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम (EVM) मशीनद्वारे ही निवडणूक घेण्यात आली. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण रुजवण्यासाठी आयोजित या निवडणुकीत सर्वसाधारण निवडणुकांप्रमाणेच उमेदवारी अर्ज, छाननी, माघारी, प्रचार आणि गुप्त मतदान अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
​ या निवडणुकीत जनरल सेक्रेटरीपदी (G.S.) कृतार्थ विलास वैद्य तर विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी (L.R.) प्रगती गजराज पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांच्यासोबतच वर्गवार प्रतिनिधी व सह-प्रतिनिधी म्हणून खालील विद्यार्थी बहुमताने विजयी झाले : इ. ५ वी – रुद्रा दशरथ राऊत व यश जयेश सावला, इ. ६ वी अ – साई अनिल पाटील व रिया बुरबुसे, इ. ६ वी ब – ऋग्वेद संभाजी काशिदकर व विराज विजय राणे, इ. ७ वी अ – समर्थ साताप्पा खोत व प्रथमेश शरद देसाई, इ. ७ वी ब – मृण्मयी मोहन शेवाळे व राजवीर प्रकाश एकशिंगे, इ. ८ वी अ – उत्कर्षराजे सचिन राऊळ व अंतरा सयाजी गायकवाड, इ. ८ वी ब – हर्षवर्धन विकास देसाई व अथर्व अंकुश भांदिगरे, इ. ९ वी अ – यशोधन सुनील वारके व ऋषिकेश संतोष कामते, इ. ९ वी ब – साईराज शांताराम पाटील व स्वरा प्रवीण तोंदले, इ. १० वी अ – सुयश महेश भारमल व सिद्धी दत्तात्रय शेणवी इ. १० वी ब – वैदेही युवराज भंडारी व शंभूराजे संताजी घोरपडे


​ ​प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. जिमखाना विभाग प्रमुख पी. पी. भंडारी व आर. पी. गव्हाणकर यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ही निवडणूक अत्यंत चोखपणे पार पाडली. ​या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून निवृत्त मुख्याध्यापक श्री. आर. वाय. देसाई यांनी काम पाहिले. तर केंद्राध्यक्ष म्हणून सौ. सुनीता पाटील, श्रावणी मोरे, श्रेया घोडके यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. ​निवडणूक यशस्वी करण्यासाठी युवराज शिगावकर, श्रीमती आर. आर. बहादुरे, बी. के. इंगळे, अजित साळवी, राजेश गिलबिले, विद्याधर परीट, धीरज मेंगाणे, ऋषिकेश गव्हाणकर, संतोष पाटील, शुभम कोकाटे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
​ ​डिजिटल युगात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. या नाविन्यपूर्ण आणि आदर्श निवडणूक प्रक्रियेचे परिसरातील पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button