ताज्या घडामोडी

चैनीसाठी घरफोडी करणाऱ्या युवकास अटक: हलकर्णी घरपोडी प्रकरणी कारवाई : तीन लाखाचा ऐवज हस्तगत

चैनीसाठी घरफोडी करणाऱ्या युवकास अटक:

हलकर्णी घरपोडी प्रकरणी कारवाई : तीन लाखाचा ऐवज हस्तगत

सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
मोबाईल गेमिंग ॲपच्या माध्यमातून चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या नादात घरफोडी केली आणि पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला. हलकर्णी ता गडहिंग्लज येथील विनायक पांडुरंग चौगुले (वय 21) या युवकाला हलकर्णी येथील तीन घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले आहे. सुमारे पावणेतीन लाख रकमेचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत गडहिंग्लज पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार हलकर्णी येथील घरफोडीत संशयित चौगुले याने मोबाईल गेमिंग ॲपच्या माध्यमातून चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या नादात पावणेतीन लाखाची घरफोडी केली. त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम याचा समावेश आहे.३० जून रोजी रात्री विकास बावचीकर यांच्या राहत्या घरातील २ लाख १० हजार किमतीचे सोन्याचे ४ऐवज, विष्णुपंत जारकोळी यांच्या घरातून ४८ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने आणि दुंडप्पा चिगरी यांच्या घरातून १२ हजार रोख रक्कम असे एकूण दोन लाख ७० हजार रकमेचा ऐवज चोरीस गेला होता.
पी एस आय रमेश मोरे, पोलिस रोहिदास नांगरे, किल्लेदार, प्रियांका इंगवले, सचिन शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button