जिल्हाताज्या घडामोडी

गांधी जयंतीनिमित्त औंढा नागनाथ येथे नशाबंदी सप्ताहाचे उद्घाटन: व्यसनमुक्त भारताचा संदेश; जनजागृती पत्रकांचे वितरण

गांधी जयंतीनिमित्त औंढा नागनाथ येथे नशाबंदी सप्ताहाचे उद्घाटन:

व्यसनमुक्त भारताचा संदेश; जनजागृती पत्रकांचे वितरण

औंढा नागनाथ | सिंहवाणी ब्युरो
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र औंढा नागनाथ नगरपंचायतीमध्ये नशाबंदी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, वरिष्ठ लिपिक विजय महामुने, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल, नशाबंदी मंडळाचे तालुका संघटक हनुमंत देशपांडे आदी उपस्थित होते.

नशाबंदी सप्ताहाचे महत्त्व विशद करताना विशाल अग्रवाल यांनी व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुका संघटक हनुमंत देशपांडे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीविषयक पत्रकांचे वितरण केले. नशाबंदी सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनांविरोधात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

सिंहवाणी लाईव्ह न्यूज
निर्भीड • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
संपादक : किशोर आबिटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button