ताज्या घडामोडी

एक पुस्तक परिक्षण अटलबिहारी बाजपेयी एक न सुटलेले कोडे

एक पुस्तक परिक्षण
अटलबिहारी बाजपेयी एक न सुटलेले कोडे

डॉ सुभाष देसाई कोल्हापूर

 

हे एक नवीन पुस्तक अभिषेक चौधरी यांनी लिहिलेले आहे 327 पेजीस आणि 899 रुपये किमतीचे पुस्तक मार्केटला आले आहे बाजपेयी हे एक अनाकलनीय कोडे आहे
मी स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांना दोन वेळा प्रत्यक्ष समोरासमोर भेटलो आणि लोकसभेमध्ये जाऊन त्यांचे भाषणही ऐकले होते त्यामुळे या नव्या पुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सहजच वाढलेली होती
या पुस्तकात म्हटले आहे की अटलजी हे सात भावंडामधले पाचवे भावंड होत त्यांचा जन्म ग्वाल्हेरला नव्हे तर आग्र्यापासून 66 किलोमीटर अंतरावरील बटेश्वर या उत्तर प्रदेशमधल्या गावात झाला होता .शालेय जीवनामध्ये अटलजी अतिशय फारच सर्वसामान्य बुद्धीचा असा विद्यार्थी होते साधारण ते . पंचवीस वर्षाचे असताना भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाची फाळणी झाली त्यावेळी पासून त्यांच्या मनामध्ये इस्लाम आणि मुस्लिम समाजाबद्दल एक प्रकारचा राग आणि द्वेष निर्माण झालेला होता त्यावेळी महात्मा गांधींनी आरएसएसच्या खाजगी आर्मीवर नापसंती व्यक्त केली होती आणि ती स्वतंत्र भारताला त्रासदायक ठरेल म्हणून त्यावर बंदी घालावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती अर्थात केंद्रीय गृहमंत्री वल्लभाई पटेलना ही भूमिका प्रारंभी मान्य नव्हती त्यांना वाटत होते की आरएसएसचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल या पुस्तकाच्या पान नंबर 58 वर लिहिले आहे की,संघ चालक गोळवलकर यांनी 8 डिसेंबर 1947 रोजी एक गुप्त बैठक बोलावली होती त्यात महात्मा गांधी यांना मारणे फारसे कठीण नाही पण ते भारतीय संस्कृतीला शोभणारे नाही असे मत व्यक्त केल्याचा उल्लेख आहे.
महात्मा गांधींचा खून नथुराम गोडसे यांनी केल्यावर मात्र वल्लभभाई पटेल भडकले आणि त्यांनी संघावर बंदी घातली या वेळेला आर एस एस ने हिंदू महासभेपासून आम्ही वेगळे आहोत अशी भूमिका घेतली. पुस्तकाच्या पान 67 वर एक धक्कादायक माहिती आहे की महात्मा गांधींच्या अंत्यविधीची तयारी करण्यामध्ये पुढाकार घेतलेली व्यक्ती हिंदू महासभेच्या एका प्रमुख नेत्याचा चिरंजीवच होता म्हणजे गांधीला मारणारे ही तेच आणि अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेणारे ही तेच अशी ही राष्ट्रीय सेवक संघाची कुट नीती आहे तरीही त्याला ते अधर्म मानत नाहीत हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे
19 53 मध्ये वाजपेयी श्यामाप्रसाद मुखर्जींचे खाजगी चिटणीस बनले आणि तिथून त्यांनी राजकारणात उडी घेतली त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय यांच्या सानिध्यात अटलजी आले उपाध्याय त्यांना आपला वारस म्हणत होते आणि त्यावेळी पासून जनसंघाची धुरा अटल बिहारी बाजपेयीनी सांभाळली कारण उपाध्याय यांचेही अकाली,अपघाती निधन झाले
या काळात अटलजींचा भारतीय लोकसभेमध्ये प्रवेश झाला अनेक वेळा ते जवाहरलाल नेहरूंच्यावर टीका करीत परंतु नेहरूंच्या मनात त्यांच्याबद्दल आकस नव्हता उलट पहिली परराष्ट्र यात्रा नेहरूंनी त्यांना घडवली 68 ते 77 हा काळ इंदिरा गांधींच्या वर्चस्वाचा होता 1998 ला ते पंतप्रधान झाले लखनऊ मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या आदल्या दिवशी बाजपेयींचे भडकाऊ भाषण झाले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना त्याची व्हिडिओ क्लिप दाखवली तेव्हा मी तसे बोललो नव्हतो मला तसे म्हणायचे नव्हते असे गोंधळलेले उत्तर त्यांनी दिले होते अनेक वेळेला त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये दोन व्यक्तिमत्व लपलेली होती .एक खरा आणि एक ढोंगी.तेअविवाहित होते पण ब्रम्हचारी नव्हते असे टीकाकार म्हणतात
एकंदरीतच राष्ट्रीय सेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पक्ष आणि त्यांची विचारसरणी हे एक दुभंगलेले राजकीय व्यक्तिमत्व आहे भारतीयांना न सुटणारे कोडे आहे हे मात्र खरे.
डॉ सुभाष देसाई कोल्हापूर
फोन ९४२३०३९९२९.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??