आपला जिल्हाताज्या घडामोडी

शाहू राजांना विजयी करा थापा मारणारऱ्या मोदी सरकारला हाकला – भास्कर जाधव महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे सभा

शाहू राजांना विजयी करा..
थापा मारणारऱ्या मोदी सरकारला हाकला

भास्कर जाधव
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे सभा


सिंहवाणी ब्युरो/ गडहिंग्लज
‘लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात १९० जागांसाठी मतदान झाले आहे. पण, कोल्हापुरात आलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी भाजप आताच दोनशेपार गेल्याचे सांगितले. काय फेकाफेक करायची याला काहीतरी मर्यादा आहे की नाही. २०१४ ला थापा मारून ते सत्तेवर आलेत. तेव्हा बळी पडलात. आता पुन्हा थापांना बळी पडू नका’, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ सभा झाली. याप्रसंगी जाधव बोलत होते. म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली.

सतेज पाटील म्हणाले, ‘अलीकडच्या काळात

वातावरण गढूळ झाले आहे. तुमची अस्मिता, स्वाभिमान जपायचा असेल तर छत्रपती शाहू – महाराज हे एकच उत्तर आहे.’ शाहू महाराज म्हणाले, ‘गडहिंग्लज सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शहर आहे. शहराच्या विकासाच्या दिशेने अधिक पावले टाकूया.’ शिवप्रसाद तेली यांनी स्वागत केले. यावेळी संजय पवार, नंदाताई बाभुळकर, स्वाती कोरी यांचीही भाषणे झाली.

ईव्हीएमचा धोका कायम…

भास्कर जाधव म्हणाले, ‘निवडणुकीत ईव्हीएमचा धोका कायम आहे. त्याबाबत जागरुक राहिले पाहिजे. पहिल्या पाचशे मतात काही केले जात नाही. पण, दुसऱ्या पाचशेमध्ये हेराफेरी होण्याची शक्यता आहे. याला उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष द्या.’

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??