आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रसूती दरम्यान महिलेला मारहाण गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार शिवसेना ठाकरे गटाने विचारला वैद्यकीय अधीक्षकांना जाब : अनेक कारनामे चर्चेत!

प्रसूती दरम्यान महिलेला मारहाण
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

शिवसेना ठाकरे गटाने विचारला वैद्यकीय अधीक्षकांना जाब
: अनेक कारनामे चर्चेत!


सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय हे सर्वसामान्यांचे आधारवड आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य रुग्ण उपजिल्हा रुग्णालया त उपचारासाठी दाखल होतात. सध्या खासगी रुग्णालया रुग्णालयात प्रसूती विभागाकडे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून प्रसूतीदरम्यान मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शनिवारी शिवसेना उ बा ठाकरे पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारला. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी लावून धरली. उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचा कारभार चर्चेत सापडला आहे. शिवसेनेचे सं भा जी पाटील, दिलीप माने, अजित खोत, काशिनाथ गडकरी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरत प्रश्नाची सरबत्ती केली.
.
गडहिंग्लजपासून जवळच असणाऱ्या गावातील महिलेला प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नॉर्मल प्रसूतीदरम्यान संबंधित महिलेला वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेच्या पायावर मारहाण करत शिव्या देत वेदना सहन करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित महिलेची प्रसूती झाल्यानंतर नातेवाईकांनी तिच्या पायावर उठलेले व्रण पाहून प्रशासनाकडे धाव घेतली.

संबंधित रुग्णाला तत्काळ डिस्चार्ज देऊन प्रकरणावर पडदा पाडण्यात आला.

यापूर्वी अनेकदा उपजिल्हा रुग्णालय चर्चेच्या गर्तेत राहिले आहे. अनेकदा सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांच्या वर्तनात तसूभरही फरक पडलेला नाही. उपजिल्हा रुग्णालया चा कारभार नेहमीच चर्चेत सापडतो. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आंदोलन करतात तिकडे दुर्लक्ष केले जाते. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालये आहेत तिकडे दुर्लक्ष केले जात आहे या बाबत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??