आपला जिल्हाताज्या घडामोडी

अचलेर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेला सोमवार पासुन प्रारंभ : श्री शंभु महादेवाची ऐतिहासीक कावड मुख्य आकर्षण

अचलेर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेला सोमवार पासुन प्रारंभ

: श्री शंभु महादेवाची ऐतिहासीक कावड मुख्य आकर्षण

 

सिंहवाणी ब्युरो/ महेश गायकवाड, सोलापूर

लोहारा तालुक्यांतील अचलेर गावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेला सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 पासुन प्रारंभ होत असुन ही यात्रा पाच दिवस चालणार आहे, या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली श्री शंभु महादेवाची ऐतिहासीक कावड भव्य भगव्या ध्वजासह आणि मोठ्या जलकुंभासह भिमनगर येथील कावडी चे मुख्य विश्वस्त आणि मुख्य मानकरी कै. शंकर साधू गायकवाड यांच्या घरातून परंपरागत पद्धतीने निघणार आहे. श्री शंभू महादेवाची ही कावड सद्याचे मानकरी महादेव शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य विश्वस्त शंकर साधू गायकवाड यांचे नातवंडे मल्लिनाथ सहदेव गायकवाड, शंकर महेश गायकवाड, सुयश महेश गायकवाड, प्रतिक बसवेश्वर गायकवाड, चेतन बसवेश्वर गायकवाड, विवेक परमेश्र्वर गायकवाड, सिध्दार्थ ब्रम्हू गायकवाड अमोल ब्रम्ह गायकवाड, नाती कोमल गायकवाड सविता गायकवाड सुजाता धोडमनी तसेच निकिता विष्णु गायकवाड, उमा महादेव गायकवाड, आणि विषाखा परमेश्र्वर गायकवाड
व नात सुना आरती शंकर गायकवाड, पणतू सतेज शंकर गायकवाड, राहुल चंद्रकांत धोडमनी, रोशनी चंद्रकांत धोडमनी या सर्वांनी मिळुन परंपरागत पद्धतीने कावड वाजत गाजत यात्रेत सहभागी करत असतात.
निलगंगेच्या डोंगर रांगेत असलेले आणि प्रति श्रीशैल मल्लिकार्जून समजले जाणारे श्री मल्लिकार्जुन देवाचे मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून मंदिराचा कळस व शिखर हे अतिशय उंच एस आहे, तर मंदिरतील श्री महादेवाची पिंड ही दक्षिणा भिमुख आहे. यात्रेसाठी मंदिरातून देवाला सोमवार दिनांक 8 एप्रिल 24 रोजी रात्री गावातील विरक्त मठात आणले जाणार आहे. मंगळवार दिनांक 9 एप्रिल 24 गुडी पाडवाचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असुन गुडी पाडव्याच्या या मुहूर्तावर पहाटे ग्रामस्थांचे अभिषेक आणि दंडवत हे कार्यक्रम पार पडणार आहेत, या नंतर दुपारी ठीक 4 वाजता भिम नगर येथुन श्री शंकर साधू गायकवाड यांचे उत्तराधिकरी आणि श्री शभु महादेव कावडीचे मानकरी महादेव शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हलगी तुतारी बेंडबाजा ढोल ताशा व इतर प्रारंपारिक विविध वाद्यांच्या गजरात कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी गावातील विरक्त मठाकडे जाईल, यांनतर विरक्त मठातून श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी आणि श्री महादेवाची कावड तसेच मानाचे सर्व नंदिकोल यांची भव्य शोभा यात्रा निलगंगेच्या डोंगर रांगेत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे निघणार आहे. या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेली श्री शंभू महादेवाची ऐतिहासीक कावड ही भव्य भगव्या ध्वजासह आणि जलकुंभासह श्री शंभु महादेवाचा धावा करत जेव्हा पळत निघते, तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेते, हे या यत्रेतील मुख्या आकर्षण आहे. श्री शंभू महादेवाची ऐतिहासीक कावड आणि श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी हे मदिरत जात असताना भाविकांकडून कावडी वर आणि पालखी वर गुळ,खोबरे, खडी,साखर यांची मुक्त पणे उधळण केली जाते, श्री मल्लिकार्जुन मंदिरात पालखी तसेच कावड आणि नंदिकोल हे विसावल्यावर सर्व देवी देवतांची पुजा अर्चा केली जाते, व श्री बसवेश्वर मंदिरात पुजा करुन मदिराला प्रदक्षिणा घालून मंदीर परिसरात असेलल्या मुख्य दीपमाळा पेटविल्या जातात, यांनतर गोडे तेलाच्या असंख्य मशाली आणि श्री शंभू महादेव कावडी ची मोठी मशाल यांच्या उजेडात देवाला पालखी मध्ये विराजमान करण्यात येते, आणि पुन्हा सर्वात पुढे कावड यांनतर नांदिकोल मग पालखी असे हे सर्व विविध वाद्यांच्या गजरात आणि वाजत गाजत आणि फुलबाजे व दारू चे औट गोळे उडवत आणि नाचत गाjत गावातीलच मठाकडे घेवून येतात,
बुधवार दिनांक 10 एप्रिल 24 रोजी सायंकाळी सहा वाजता श्री अंबाबाई मंदिरा जवळ भव्य असा शोभेचे दारूकाम सोहळा पार पडणार आहे. यांनतर 11 एप्रिल 24 रोजी नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फड श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरात रंगणार आहे. या वेळी आलेल्या सर्व भक्तांसाठी खिरीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. दिनांक 12 एप्रिल 24 रोजी देव बोळवण्याच्या कार्यक्रमाने पाच दिवस चालेल्या या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेत दररोज करमणुकीचे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. सोमवारी आशाताई राऊत लातूर यांचे भव्य कीर्तन रात्री 9 वाजता होणार आहे. मंगळवारी पाडवा दिवशी रात्री 9 वाजता मनोधैर्य नाट्य मंडळ आयोजितत सामाजिक तिन अंकी नाटक ” रक्तात भिजली नाती ” हा प्रयोग सादर केला जाणार आहे.
बुधवारी सकाळी 10 वाजता भव्य भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार रोजी शकुंतला नाईक (गुलबर्गा) व भिमशा कडदाळे (रायबाग) यांचे डफावरचे कन्नड गाणे होणार आहेत
सतत तिन दिवस सामजिक नाटक सादर केले जाणार आहे
ही यात्रा मोठया उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यासाठीं यात्रा कमिटी प्रयत्नशील असून सर्वांनी यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन यात्रा उत्साहात आणि आनंदात व शांततेने साजरी करावी असे आवाहन श्री मल्लिकार्जुन देवस्थान यात्रा कमिटीने केले



गावांतील बेकायदेशीर अवैध धंदे व हातभट्टी दारू बंद करण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
गावचे ग्राम दैवताची यात्रा असल्यामुळे ही यात्रा मोठया उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते, या यात्रेत सहभागी होण्यासाठी अचलेर पंचक्रोशीतील आणि बाहेर गावी कामा धंद्यासाठी गेलेले सर्व जण गावांत आलेले असतात, दूरवरचे भक्त मंडळीही यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात, त्यामुळे गावची यात्रा उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी गावातील सर्व अवैध धंदे, हातभट्टी दारू चे अड्डे यात्रा काळात बंद करण्यात यावेत, शी मागणी ग्रामस्थानी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??