आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

वाघापूर येथे यशवंत जठार यांनी घेतले उच्चांकी एकरी १३४ टन उस उत्पादन देवकर ऍग्रोचे मार्गदर्शन

वाघापूर येथे यशवंत जठार यांनी घेतले उच्चांकी एकरी १३४ टन उस उत्पादन

देवकर ऍग्रोचे मार्गदर्शन



सिंहवाणी ब्युरो/ वाघापूर
मौजे वाघापूर ता. भुदरगड येथील यशवंत पांडुरंग जठार ( मो.नं 9552544153 ) यांनी उच्चांकी एकरी १३४ टन उस उत्पादन को.८६०३२ या पिकांत घेतले असून या प्लॉटला शरद देवेकर यांचे संपूर्ण मार्गदर्शन दिले होते.

यामध्ये मशागत पद्धती मधील बदल, उसाचे संख्या नियोजन, पाणी नियोजन, विविध संजीवकांच्या फवारण्या तसेच सेंद्रिय खतांचा वापर आणि ब्लॅक कॅट व ब्लॅक कमांडो यांचा वापर तसेच पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत नियोजन आणि विविध बॅक्टेरिया यांचा वापर अशा अनुषंगाने हे उत्पादन घेणे शक्य झाले. याशिवाय झेंडू आंतर पिकाच्या माध्यमातून ३५ हजाराचे उत्पादन त्यांना मिळाले.

तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत या उसाचे वजन करण्यात आले. एक उसाचे वजन सरासरी ४ किलो १००ग्रॅम इतके होते. प्लॉटमध्ये ३०गुंठ्यामध्ये प्लॉटमध्ये ३१००० उसांचे संख्या नियोजन करण्यात आले होते. एका गुंठ्यामध्ये ३टन३४० किलो इतके उत्पादन घेण्यात आले. म्हणजेच एकरी १३४ टन ऊस उत्पादन सदर प्लॉटमध्ये मिळाले. उसाची तोडणी चालू असून तर ८ गुंठ्यत ३०टन उत्पादन आज प्राप्त झाले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील बोलताना म्हणाले, तंत्रयुक्त शेती करण्याशिवाय चांगले उत्पादन घेता येत नाही. तंत्रयुक्त शेती करूनच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेता येईल असे, ते पुढे म्हणाले. स्वर्गीय सुशीलादेवी आबिटकर अग्रिकल्चर फाउंडेशन व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने एकरी ६०टन उस उत्पादकता वाढ स्पर्धा चालू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, कृषी सहाय्यक जयश्री पाटील, आत्मा कमिटीचे सल्लागार सदस्य अरविंद जठार, बी.एस. खापरे, देवेकर ऍग्रो चे शरद देवेकर, अरुण दाभोळे तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.


देवेकर ऍग्रो
आजरा बॅंके समोर
शरद देवेकर
मो. नं 9860482095

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??