आपला जिल्हाताज्या घडामोडी

छत्रपती शाहूराजांचा विचारच संसदेत पोहचू नये म्हणून नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले.. … रोहीत आर पाटील गारगोटीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार.. -शाहूराजे गारगोटीच्या सभेला प्रचंड जनसमुदाय

छत्रपती शाहूराजांचा विचारच संसदेत पोहचू नये म्हणून नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले..

रोहीत आर पाटील

गारगोटीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार.. –शाहूराजे

गारगोटीच्या सभेला प्रचंड जनसमुदाय

सिंहवाणी ब्युरो/ गारगोटी

राजर्षी शाहू चा विचार ही कोल्हापूर ची ओळख असुन छत्रपती शाहुच्या विचाराला विरोध करण्यासाठी च देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले त्यामुळे राजर्षी शाहूंचा विचार जपुया आणि महाराजांना दिल्लीला पाठवुया असे युवा नेते रोहीत आर पाटील यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गारगोटी ( ता . भुदरगड ) येथे क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राम कळंबेकर होते.तर माजी आमदार दिनकरराव जाधव प्रमुख उपस्थित होते.सभेस तालुक्यातून लोकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती.
रोहीत पाटील पुढे म्हणाले की,या सरकारने मुलभुत प्रश्नावर काय नियोजन केले हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे, सरकारकडून सर्वसामान्य माणसाची गळचेपी सुरू असुन राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिशा आली आहे त्यामुळे कोल्हापूर ची अस्मिता टिकवुया.निवडुन गेलेले नेत्यांशी प्रामणीक राहीले नाहीत ते तूमच्या आमच्याशी तरी प्रामणीक राहतील का? त्यामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थीत शाहु महाराज उभे राहिले त्यामुळे पाच लाखांच्या मताधिक्याने मतांनी निवडून देवूया.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले की,लोकसभेचा पहिला फंड येईल त्यामधुन गारगोटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाईल त्यासाठी सर्वातोपरी सहकार्य केले जाईल.
आमदार सतेज पाटील म्हणाले की,लोकसभेची लढाई ही वैचारिक विचारांची लढाई असुन सामान्य माणसाचे अश्रु पुसण्याचे काम छत्रपती घराण्याने केले असुन शत्रू वर चढाई करण्याची वेळ आली असुन शाहुचा विचार दिल्लीत गेला तरच मोदींचे दुकान बंद होणार आहे,विरोधी उमेदवारांनी चुकीचे काही बोलू नये नाही तर आम्ही बोलायला लागलो तर तुमची पळता भुई थोडी होईल असा इशारा ही मंडलीक यांचे नाव न घेता दिला.

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले , खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने चार विजय निश्चित आहे ,लोकांना मोदी पंसत नाही तर बंटी पाटील पंसत आहेत,वैती मालाला भाव मिळायचा असेल तर मोदी सरकार हटवा,रक्ताने हात माखलेला पंत प्रधान आपल्याला नको आहे.खोके साठी तत्व सोडणारी ही मंडळी कसला विकास करणार हा मोठा प्रश्न असुन शाहु महाराजांनी मराठा आरक्षणाकरीता अंतरवाली सराटी येथे जावुन मनोज जरांगेनाच्या आंदोलनाला पाहिला पाठिंबा जाहीर केला ,मोदीचे सरकार शेतकरी विरोधी हे सरकार आदानी अंबानीचे आहे.
भुदरगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामरावदादा देसाई म्हणाले की,देशामध्ये एकाधिकारशाही चालू असुन महाविकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत असून भुदरगड तालुका मोठ्या ताकतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी राहील.
बिद्री चे संचालक सत्यजितराव जाधव म्हणाले , भुदरगडमधुन मताधिक्य आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही देणार असुन ,भाजपने फसवेगिरी राजकारण सुरू केले आहे युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे तर , खाजगी करण करुन देश अधोगतीकडे नेला आहे.

सभेत प्रसाद पिलारे, सचिन घोरपडे,पी एस कांबळे यांची भाषणे झाली.यावेळी माजी उपसभापती सत्यजीत जाधव, विश्वजीत जाधव, गारगोटी चे म माजी सरपंच राजू काझी,बिद्री चे माजी संचालक प्रकाशराव देसाई, शंभूराजे देसाई, मच्छिंद्र मुगडे,सम्राट मोरे, भुजंगराव मगदुम ,सुशांत माळवी, सचिन भांदिग्ररे ,नितीन बोटे संतोष मेंगाणे , अविनाश शिदे ,यांची भाषणे झाली तर , काँग्रेसचे अध्यक्ष शामरावदादा देसाई,बिद्री चे संचालक सत्यजीत जाधव, डी एस पाटील , नेताजी पाटील ,संतोष मेंगाणे ,माजी जि प सदस्य आर व्ही देसाई , पि एस कांबळे, बाळासाहेब गुरव उपस्थित होते.
आभार यांनी मानले.



तुडूंब गर्दी

तालुक्यातील माजी आमदार,बिद्री साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरराव जाधव वगळता एक ही प्रमुख नेते छत्रपती शाहू महाराज यांच्या कडे नाहीत मात्र सभेला लोकांनी तुडुंब गर्दी केली विशेष म्हणजे सभा वेळाने सुरू होवून देखील क्रांती सिंह नाना पाटील चौक गर्दीने भरून गेला.

मताधिक्य देणार
तालुक्यातील काहीशी विस्कटलेली कांग्रेस गेल्या दोन वर्षांत आमदार सतेज पाटील यांनी जातीनिशी लक्ष घालून मजबुत केली असुन गावोगावी संघटन आम्ही मजबुत करीत आहोत लोकसभा निवडणूक छत्रपती शाहू महाराजांना भुदरगड तालुक्यातुन मताधिक्य देणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष शामरावदादा देसाई यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??