आपला जिल्हाताज्या घडामोडी

संसदेमध्ये शाहू छत्रपतींच्या विचारांची माणसे जाणे गरजेचे.. प्रा.जयंत आसगावकर राजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया – देवणे


संसदेमध्ये शाहू छत्रपतींच्या विचारांची माणसे जाणे गरजेचे..
प्रा.जयंत आसगावकर

राजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया – देवणे



सिहवाणी ब्युरो/ पिंपळगाव
देश व राज्यातील फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला रुचलेले नाही .साधी राहणी व उच्च विचारसरणी ही शाहू छत्रपतीँची स्वभाववैशिष्ट्य आहेत. देशाच्या सर्वोच्च संस्थेपैकी एक असलेल्या संसदेमध्ये शाहू छत्रपतींच्या विचारांची माणसे जाणे नितांत गरजेचे आहे.म्हणूनच त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे ,असे आवाहन शिक्षक पदवीधर मतदान संघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव(ता.भुदरगड)येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,वाचनाची आवड,खेळावर प्रेम आणि राजेपण विसरून सामाजिक जाणिवेचे भान ठेवत संकटकाळी मदतीला धावणारे राजर्षी शाहू महाराजांचे पणतू असलेल्या शाहू छत्रपतींनी सामाजिक बांधिलकीचे भान कायम ठेवले आहे.प्रलयंकारी महापुराच्या काळात नवीन राजवाड्यातील शाळा पूरग्रस्तांना खुली करून त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करून त्यांना धीर देण्याचे काम त्यांनी केले.गेल्या पाच वर्षाच्या काळात निष्क्रियपणे काम करणाऱ्या खासदारांना आता घरी बसविण्याची वेळ आली असून जिल्ह्यातील विकासासाठी राजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया.
यावेळी ए.वाय.पाटील म्हणाले ,आम्ही राधानगरीतील सर्व राजकीय मंडळी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आलो असून राधानगरीमधून शाहू छत्रपतीना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला असून भुदरगडमधूनही मोठे मताधिक्य देण्यासाठी नेतेमंडळीनी दिवसरात्र काम करून मेहनत करावी.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी भुदरगडमधून सर्व नेतेमंडळी एकसंधपणे प्रयत्न करून विद्यमान खासदारांना घरी बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.
या प्रचारसभेस शामराव देसाई,सचिनदादा घोरपडे, सत्यजित जाधव ,प्रकाशआण्णा देसाई,अशोकराव पाटील , राजू काझी, अतुल नलवडे , शिवाजीराव पाटील ,दिलीप कदम,उदय पाटील ,बाबुराव कांबळे ,बाजीराव दुधाळे आदी उपस्थित होते.

######

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??