जिल्हाताज्या घडामोडी

भुदरगडमधून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

भुदरगडमधून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

गारगोटी | सिंहवाणी ब्युरो
भुदरगड तालुक्यातील सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांनी जंतर-मंतर येथे उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ सुभाष देसाई म्हणाले
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून उमललेलं खरं कमळ म्हणजे संविधान याउलट सनातन धर्माच्या नावाखाली रूढी, परंपरा, भेदा भेद ,चारित्रहीनता अशा चिखलातून भाजपचे कमळ दुर्गंधी घेऊन आले आहे .देशाच्या विविध प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या जंतर-मंतर वरील तरुणांची संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर अनावश्यक दडपशाही होत आहे अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे त्यामुळे लोकशाहीवरील आमचा विश्वास कमी झाला असून समाजात असंतोष वाढतो आहे म्हणून आम्ही सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहोत असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी तहसील कार्यालयासमोर झालेल्या आपल्या भाषणात मांडले या वेळीभुदरगड तालुक्यातील सर्वपक्षीय सर्व धर्मीय आंदोलकांनी सरकारला निवेदन दिले .
भुदरगड तालुक्यातील हुतात्मा स्मारकापासून मागण्यांचे बोर्ड आणि घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या भाजप सरकारचे करायचं काय?” खाली डोकं वर पाय “भ्रष्ट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या” मोदी सरकार हाय हाय ” नीट पेपर फुटी चा निषेध असो अशा तऱ्हेच्या घोषणा देत भर पावसात आंदोलक तहसील कार्यालयावर पोचले . तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर अनेक आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तहसीलदारांना देण्याचे निवेदन के.के भारतीय यांनी साऱ्यांना दिले .
भुदरगड तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी येण्याचे धाडस न दाखवता कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून निवेदन स्वीकारले. मात्र भुदरगड पोलिसांनी सभ्यपणे आंदोलन हाताळले. या मोर्चामध्ये काही तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना मोदी ,शहा ,मोहन भागवत यांचे आम्हाला मौन नको आमच्या प्रश्नाला उत्तर द्या पळपुटेपणा करू नका” अशातऱ्हेची मागणी केली .या मोर्चामध्ये कॉम्रेड राम कळंबेकर, डॉक्टर राजीव चव्हाण, डी एस देसाई ,आर वाय देसाई , एम एस मोरस्कर, शिवाजी जाधव, अविनाश शिंदे, मच्छिंद्र मुगडे,डॉ राजेंद्र यादव सर,धनराज चव्हाण,शहाजी देसाई ,मानसिंग देसाई , कॉम्रेड राजेंद्र यादव,जोतीराम सोरटे,सचिन कांबळे , कृष्णकुमार सरनाईक , जे.बी.सोरटे , मोहन लिंकर ,शिवाजी कांबळे , मिलिंद प्रधान,पी एस मालप, डी एस देसाई,शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button