जिल्हाताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय मराठी निबंध स्पर्धेत संजय खोचारे द्वितीय

जिल्हास्तरीय मराठी निबंध स्पर्धेत संजय खोचारे द्वितीय

सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव :
बोरवडे (ता. कागल) येथे शिव-शंभो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या मराठी निबंध लेखन स्पर्धेत संजय खोचारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

संजय खोचारे हे आंतरभारती शिक्षण मंडळ, उत्तूर संचलित कर्मवीर विद्यालय, चिमणे या माध्यमिक शाळेत मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. महादेव साठे, प्रा. अतुल कुंभार, आर. पी. वारके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button