आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र; गारगोटीत मानसिक आरोग्याचा जागर ### सेवा संकल्प अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटीचा उपक्रम; ८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवनाचा कानमंत्र; गारगोटीत मानसिक आरोग्याचा जागर

# सेवा संकल्प अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटीचा उपक्रम; ८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गारगोटी : सिंहवाणी ब्युरो
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, अभ्यासाचा ताण आणि स्पर्धेच्या वातावरणात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग्य मार्गदर्शन व समुपदेशन महत्त्वाचे ठरते. याच उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी यांच्या वतीने कर्मवीर हिरे महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड अॅप्लिकेशन विभागाच्या सहकार्याने मानसिक स्वास्थ्य विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या व्याख्यानात उपजिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुप्रिया खन्ना यांनी सुमारे ८० विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवन आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव समजून घेणे आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहणे किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी समुपदेशक जयवंत सावंत यांनी एचआयव्ही (HIV) आणि एड्सविषयी सविस्तर माहिती देऊन या विषयासंदर्भातील जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, सौ. प्रिया पाटील तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड अॅप्लिकेशन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.

**विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.** सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button