जिल्हाताज्या घडामोडी

भुदरगडमध्ये ‘स्टार्टअप इंडिया’च्या माध्यमातून युवकांना उद्योगाची नवी संधी! शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणार; स्टार्टअप इंडियाची तालुका कार्यकारिणी जाहीर

भुदरगडमध्ये ‘स्टार्टअप इंडिया’च्या माध्यमातून युवकांना उद्योगाची नवी संधी!

शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविणार; स्टार्टअप इंडियाची तालुका कार्यकारिणी जाहीर

सिंहवाणी ब्युरो | गारगोटी
भुदरगड तालुक्यातील सूक्ष्म, लघू, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यात प्रभावीपणे काम उभे राहील, असा विश्वास स्टार्टअप इंडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भरतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी भुदरगडच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य शासनाचे विकासकाम आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न झाले पाहिजेत. विशेषतः बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे, त्यांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उद्योगांना आर्थिक व शासकीय योजनांचे पाठबळ मिळवून देणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्टार्टअप इंडिया भुदरगड तालुका कार्यकारिणी जाहीर

या स्नेहमेळाव्यात स्टार्टअप इंडिया भुदरगड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

– तालुकाध्यक्ष : सतीश जाधव (म्हसवे)
– उपाध्यक्ष : रमेश पाटील (खानापूर)
– सचिव : प्रवीण जयसिंग सावंत (देवकेवाडी)

सदस्य :
शशिकांत लोहार (पांगिरे), शिवाजी तेलंग (शेणगाव), राजकुमार लोहार (आकुर्डे), नंदकुमार जाधव (कुर), अनिल भुतर्णे (कोंडोशी), संतोष पोर्टे (नितवडे), शिवाजी कांबळे (म्हसवे) आणि सुहास चव्हाण (दारवाड).

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलेकश कांदळकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, भगवान शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे भुदरगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांना रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने स्टार्टअप इंडियाची ही तालुका कार्यकारिणी कितपत प्रभावी ठरते, याकडे आता भुदरगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button