प्राध्यापक भरती गुणांकन प्रपत्र जाहीर करणेसंदर्भात शिवाजी विद्यापीठ कुलगुरुंना निवेदन *दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रविवार अतिरिक्त तासिकांचे सीएचबी प्राध्यापकांचे मानधन ग्राह्य धरणार- कुलगुरु आर. के. कामत*

प्राध्यापक भरती गुणांकन प्रपत्र जाहीर करणेसंदर्भात शिवाजी विद्यापीठ कुलगुरुंना निवेदन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रविवार अतिरिक्त तासिकांचे सीएचबी प्राध्यापकांचे मानधन ग्राह्य धरणार- कुलगुरु आर. के. कामत*
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
प्राध्यापक भरती संदर्भातील गुणांकन तत्का जाहीर करणे बाबत व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रविवार अतिरिक्त कामकाजाचे सीएचबी प्राध्यापकाचे मानधन ग्राह्य धरणेबाबत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आर के कामत सर यांना आज संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. जोतीराम सोरटे यांनी निवेदन दिले. सोबत संघर्ष समितीचे प्रा.भारत राठोड उपस्थित होते.
राज्यात सध्या ५०१२ प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे गुणप्रपत्रक जाहीर करणे बाबत शासनाने सर्व विद्यापीठांना आदेश दिले आहेत. अद्याप विद्यापीठांच्या कडून गुणांकन तक्ते जाहीर न झाल्यामुळे प्राध्यापक भरती रखडलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. सोरटे यांनी आज शिवाजी विद्यापीठ कुलगुरूंना निवेदन देऊन तात्काळ गुणपत्रके तयार करण्यासंदर्भात विनंती केली आहे. मा. कुलगुरूंनी गुणांकन प्रपत्रके तयार करण्याचे काम चालू असून लवकरच गुणांकन प्रपत्र जाहीर केले जाईल असे सांगितले आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने रविवार अतिरिक्त कामकाजाचे परिपत्रक काढलेले आहे त्यास अनुसरून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे अतिरिक्त तासिकांचे मानधन ग्राह्य धरणे संदर्भात चर्चा करण्यात आली. त्या संदर्भात कुलगुरूंनी सीएचबीचे अतिरिक्त कामकाजाचे मानधन ग्राह्य धरणार असल्याचे सांगितले आहे.
” राज्यातील सर्वच विद्यापीठांनी एकसमान गुणांकन तक्ते तयार करणे आवश्यक आहे. काही विद्यापीठानी वेगवेगळे गुणांकन तक्ते जाहीर केल्यामुळे पात्रता धारकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भरती प्रक्रियेतील हा अडथळा शासनाने परिपत्रक काढून दूर करावा. अन्यथा भविष्यात भरती प्रक्रियेत अडचण संभवते”
प्रा. जोतीराम सोरटे
समन्वयक, संघर्ष समिती.