आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलिंपियाड मध्ये ऋषिकेश एरंडे या सुवर्णपदक जागतिक क्रमवारीत 422

इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलिंपियाड मध्ये ऋषिकेश एरंडे याला सुवर्णपदक

जागतिक क्रमवारीत 422

 

सिंहवाणी ब्युरो/ कोल्हापूर

गणितीय क्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलिंपियाड स्पर्धेत हेरले जिल्हा कोल्हापूर येथील ऋषिकेश श्रीरंग एरंडे (कुलकर्णी) विशेष प्राविण्यसह सुवर्णपदक मिळवत द्वितीय स्तरात (लेव्हल 2) प्रवेश केला असून द्वितीय स्तरातही प्राथमिक फेरीत उल्लेखनीय गुण प्राप्त केले आहेत. तो या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 422 आला आहे. ऋषिकेश पुणे वाकड येथील गुड सेमेरीटन स्कूल मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे.

सायन्स ओलिंपियाड फाउंडेशन तर्फे पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलिंपियाड चे आयोजन नोव्हेंबर /डिसेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून त्यात ऋषिकेशने मोठे यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशील विकासासाठी प्रोस्ताहित करून आव्हानात्मक अभ्यासक्रम, तार्किक युक्तिवाद, आत्मविश्वास अशामुळे स्पर्धांमुळे वाढतो.
ऋषिकेशने पहिली लेवल पार करून दुसऱ्या लेव्हर वर पोहोचला आहे. तेथेही आतापर्यंत त्याने चांगले गुण मिळवले आहेत
ऋषिकेश ला त्याच्या आई मंजिरी, वडील श्रीरंग एरंडे (कुलकर्णी), वर्गशिक्षिका कीर्ती देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??