जिल्हाताज्या घडामोडी

साळुंखे नगर सोसायटीत ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव

साळुंखे नगर सोसायटीत ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान

ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांचाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव

सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर :
कळंबा रोडवरील प्राथमिक शिक्षकांची को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात साळुंखे नगर या संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेच्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेच्या सभेत वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला.

साळुंखे नगर ही कोल्हापूर शहरातील जुन्या वसाहतींपैकी एक असून, सप्टेंबर १९६३ मध्ये या सोसायटीची स्थापना झाली. संस्थेच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विलास काइंगडे होते. सेक्रेटरी तसेच संस्थेचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.

सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या सभासद डॉ. नेहा तेंडुलकर यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दलही उपस्थितांकडून उल्लेख करण्यात आला. भाजपचे शहरातील नेते अभय तेंडुलकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

संस्थेच्या सभागृहाच्या बांधकामासाठी तसेच विरंगुळा केंद्र सुरू करण्यासाठी तेंडुलकर कुटुंबीयांनी आर्थिक व सामाजिक योगदान दिल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवाला सलाम!

वार्षिक सभेच्या निमित्ताने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या महिला व पुरुष ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ सभासदांचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या जुन्या पिढीच्या कार्याचा आणि अनुभवाचा गौरव ठरला. या उपक्रमातून ज्येष्ठांविषयीचा आदर आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button