जिल्हाताज्या घडामोडी

ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. खंडेराव बोरफळकर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी बोरफळकर यांचे निधन : दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; देवगड परिसरात शोककळा

ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. खंडेराव बोरफळकर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी बोरफळकर यांचे निधन

दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; देवगड परिसरात शोककळा

सिंहवाणी ब्युरो | देवगड
देवगड येथील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. खंडेराव बोरफळकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजयालक्ष्मी बोरफळकर (वय ७०) यांचे आज, दि. १८ रोजी सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बोरफळकर कुटुंबीयांसह देवगड परिसरात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

सौ. विजयालक्ष्मी बोरफळकर यांच्या निधनाने बोरफळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सौ. विजयालक्ष्मी बोरफळकर यांच्या निधनाने बोरफळकर कुटुंबीयांवर दुःखद प्रसंग ओढवला असून, त्यांच्या निधनाबद्दल परिसरातील नागरिकांकडून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button