गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन केंद्र: जिल्ह्यात होणार दोन सिटीस्कॅन केंद्रे :आरोग्यमंत्री आबिटकर

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन केंद्र:
जिल्ह्यात होणार दोन सिटीस्कॅन केंद्रे :आरोग्यमंत्री आबिटकर
सिंहवाणी ब्युरो : कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून जिल्ह्यात दोन सीटी स्कैन केंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. गारगोटी येथील उपजिल्हा रूग्णालय तसेच शहरातील सावित्रीबाई फुले रूग्णालय याठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत सीटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेकवेळा गरीब रुग्णांना तपासणी टाळावी लागत होती. खासगी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनसाठी दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते.
रूग्णांची गरज ओळखून निर्णय आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, ग्रामीण भागातील तसेच शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य रूग्णांना आवश्यक असलेल्या तपासण्या खाजगी दवाखान्यात परवडत नाहीत. ही गरज ओळखून शासकीय दवाखान्यांमध्ये सीटीस्कॅनची सेवा उपलब्ध करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता ही सेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना वेळेत व परवडणाऱ्या दरात तपासणी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आबिटकर यांनी व्यक्त केली
ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य
रुग्णांची गरज ओळखत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर आणि उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून लवकरच ही केंद्रे कार्यान्वित होतील, अशी माहितीही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिली.
या दोन्ही ठिकाणी सीटी स्कॅन सेवा पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार असून रुग्णांना ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः अपघातग्रस्त, मेंदूविकार, स्ट्रोक, अंतर्गत जखमा व गंभीर आजारांच्या निदानासाठी ही सुविधा