मठगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात आज आणि उद्या शिवरात्री महोत्सव यात्रा

मठगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात आज आणि उद्या शिवरात्री महोत्सव यात्रा
सिंहवाणी ब्युरो / पाटगाव
भुदरगड तालुक्यातील मठगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस महाशिवरात्र निमित्त यात्रा असून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले. भाविकांनी या काळात महादेव मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मठगाव येथील महादेव मंदिर अतिप्राचीन असून शीलाहार वंशीय राजा भोज द्वितीय यांनी या मंदिराचे बांधकाम 1175 ते 1190 या कालावधीत केले आहे. हे मंदिर सध्या दुर्गम भागात असले तरी आता मंदिराकडे जाण्याचे मार्ग झाले आहेत. मंदिरात दर सोमवारी व वर्षभर कार्यक्रम सुरू असतात. मंदिराकडे जाण्यासाठी गारगोटी पाटगाव मार्गावर तांबाळे येथून मठगाव कडे मार्ग जातो या ठिकाणाहून सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
गेल्या काही वर्षात या मंदिराकडे भक्तांचा ओघ वाढला आहे.