ताज्या घडामोडी

गारगोटी कडगाव मुख्य रस्त्यावरील करडवाडी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन…

गारगोटी कडगाव मुख्य रस्त्यावरील करडवाडी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन…


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी-कडगाव मुख्य रस्त्यावरील करडवाडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने आणि ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात सावधगिरीचे वातावरण असून नागरिकांना रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच शेतात किंवा निर्जन ठिकाणी जाताना एकटे न जाणे, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, तसेच पाळीव जनावरांची सुरक्षित व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचाली दिसल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभाग किंवा संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button