क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

ब्रेकिंग | सिंहवाणी लाईव्ह न्यूज ✈️ विमानातून चरस तस्करीचा प्रयत्न उधळला; कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यास अटक

ब्रेकिंग | सिंहवाणी लाईव्ह न्यूज

✈️ विमानातून चरस तस्करीचा प्रयत्न उधळला; कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यास अटक

कोल्हापूर | सिंहवाणी ब्युरो
कोल्हापूर विमानतळावर चरस तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळावरील तपासणीत सापडण्याच्या भीतीने एका प्रवाशाने शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात ७१ ग्रॅम चरस टाकले होते. ते बाहेर काढून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विमानतळावरील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या ओमकार अर्जुन मिठारी (वय २७, उचगाव) याच्याकडून ७१ हजार रुपयांचे चरस, मोबाईल आणि दुचाकीसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यासह या प्रकरणातील साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य तस्कराचा शोध सुरू आहे.
ठळक मुद्दे
✈️ विमानतळाच्या शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात लपवले होते चरस
🚨 बेल्ट ऑपरेटर कर्मचाऱ्याने पैसे घेऊन बाहेर काढली पुडी
📱 साथीदार संपर्कात न आल्याने स्वतःच विक्रीचा प्रयत्न
👮 ग्राहक शोधताना एलसीबीच्या सापळ्यात अटक
⚖️ गांधीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
पिस्तूल तस्करीनंतर आता चरस तस्करीचा प्रकार समोर आल्याने कोल्हापूर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button