पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ३६ किमीचा टोलमुक्त एलिव्हेटेड रिंगरोड; ₹९ हजार कोटींचा HCMTR प्रकल्प!

पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ३६ किमीचा टोलमुक्त एलिव्हेटेड रिंगरोड; ₹९ हजार कोटींचा HCMTR प्रकल्प!
पुणे | सिंहवाणी ब्युरो
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महापालिकेने हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट (HCMTR) प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ३६ किमी लांबीचा, २४ मीटर रुंदीचा आणि पूर्णपणे एलिव्हेटेड टोलमुक्त मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी ₹८ ते ₹९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी सुमारे ₹१,३०० कोटींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी ८५% जमीन शासकीय तर १५% जमीन खासगी असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया तुलनेने सुलभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी महापालिकेत स्वतंत्र HCMTR सेल स्थापन करण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच मेट्रो, बाह्य रिंगरोड आणि प्रस्तावित भुयारी मार्गाशी प्रभावी जोडणी करून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
✅ ३६ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग
✅ २४ मीटर रुंदी
✅ पूर्णपणे टोलमुक्त
✅ अंदाजित खर्च ₹८–९ हजार कोटी
✅ भूसंपादनासाठी ₹१,३०० कोटी
✅ ८५% शासकीय, १५% खासगी जमीन
✅ स्वतंत्र HCMTR सेलची स्थापना
✅ मेट्रो, बाह्य रिंगरोड व भुयारी मार्गाशी जोडणी
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “पुण्यातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून सर्वप्रथम HCMTR प्रकल्पाला गती दिली जाईल. भूसंपादनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून निधी उभारणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. हा मार्ग पूर्णपणे टोलमुक्त असेल.”
