सोनाळीत बंद घर फोडून १२.४० लाखांचे दागिने लंपास श्वानपथकासह पोलिसांची तपासाची चक्रे गतिमान

सोनाळीत बंद घर फोडून १२.४० लाखांचे दागिने लंपास
श्वानपथकासह पोलिसांची तपासाची चक्रे गतिमान
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
भुदरगड तालुक्यातील सोनाळी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १२ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भुदरगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी छाया जालिंदर मोरे (वय ५६), व्यवसाय – प्राथमिक शिक्षिका, रा. सोनाळी-गारगोटी, ता. भुदरगड यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया मोरे या शुक्रवारी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत शुक्रवारी रात्री ७ ते शनिवारी सकाळी ७ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून चोरटे पसार झाले.
चोरीची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या घटनेमुळे सोनाळी परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरीस गेलेला मुद्देमाल :
अडीच व दीड तोळ्याचे दोन सोन्याचे हार, चार तोळे वजनाचे चार सोन्याचे बिलवर, दीड तोळ्याची सोन्याची चेन, चार ग्रॅमची कर्णफुले व झुबे, सहा ग्रॅमचे कानातील टॉप्स (तीन जोड्या), चार ग्रॅमची अंगठी, एक ग्रॅमच्या बाळाच्या चार अंगठ्या, सात ग्रॅमचे तीन सोन्याचे कॉईन