जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी वर्षा पाटोळे रुजू

कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी वर्षा पाटोळे रुजू

कोल्हापूर / जिमाका:
कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा पदभार आज वर्षा पाटोळे यांनी स्वीकारला. यापूर्वी त्यांनी नाशिक, धुळे, डहाणू, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी काम केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी पदासह त्यांच्याकडे कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.

रुजू होताच त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली.


वर्षा पाटोळे यांनी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. श्रीमती पाटोळे यांनी यापूर्वी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कोल्हापूर येथे काम केले आहे.

कोल्हापूर विभागीय उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुष्पगुच्छ देवून वर्षा पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button