जिल्हाताज्या घडामोडी

उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कारप्राप्त अभिजित जगताप यांचा पत्रकारांकडून सत्कार

उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कारप्राप्त अभिजित जगताप यांचा पत्रकारांकडून सत्कार

श्रीक्षेत्र माहूर / सिंहवाणी ब्युरो, संजय घोगरे
महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांना ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर माहूर येथील पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते जगताप यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल पत्रकारांनी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल प्रकरणांचा जलद निपटारा, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण तसेच प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यामुळे माहूर तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उंचावल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, राज ठाकूर, संजय बनसोड यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
📸 फोटो:
उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांचा पत्रकारांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button