राजू एकनाथ सौंदलकर यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान नांदेड जिल्हा धनगर समाजाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव

राजू एकनाथ सौंदलकर यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान
नांदेड जिल्हा धनगर समाजाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
सिंहवाणी ब्युरो, / संजय घोगरे, माहूर
नांदेड जिल्हा धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६’ मध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे राजू एकनाथ सौंदलकर यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील विविध घटकांसाठी केलेले कार्य, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत राजू एकनाथ सौंदलकर यांची समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारामुळे माहूरसह नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कुसुम सभागृह, डी.आय.पी. रोड, नांदेड येथे नांदेड जिल्हा धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या वतीने हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याबरोबरच समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. याच अनुषंगाने राजू एकनाथ सौंदलकर यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना सौंदलकर यांनी समाजाने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, सामाजिक एकोपा आणि युवकांना योग्य दिशा देणे आवश्यक असून, भविष्यातही समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या सन्मानाबद्दल राजू एकनाथ सौंदलकर यांचे समाजबांधव, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.