जिल्हाताज्या घडामोडी

माजी आमदार स्व. आनंदराव देसाई यांची १०७ वी जयंती उत्साहात साजरी

माजी आमदार स्व. आनंदराव देसाई यांची १०७ वी जयंती उत्साहात साजरी


गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार स्व. आनंदराव देसाई तथा ‘आबाजी’ यांची १०७ वी जयंती गारगोटी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.

गारगोटी येथील शाहू वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. आनंदराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. राजन गवस म्हणाले, “स्व. आबाजी यांनी समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगले. कसे जगावे, हे त्यांच्याकडून शिकावे. माणूस आणि निसर्गावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्याकडे मोठे दातृत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेहमीच आनंदाची झलक दिसत असे.”

प्रा. आनंद चव्हाण यांनी स्व. आनंदराव देसाई यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा आढावा घेतला. कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या भुदरगड आणि राधानगरी तालुक्यात काँग्रेसची विचारधारा रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम स्व. देसाई यांनी केले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत शाहू वाचनालयाचे कार्यवाह तात्यासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समिती सदस्या रुपाली बजरंग कुरळे, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, प्रकाश देसाई, रणजित देसाई, माजी जि.प. सदस्य एस. एम. पाटील, धोंडीराम मगदूम, संजय देसाई (मडिलगे), कॉ. सम्राट मोरे, कृष्णा भारतीय, धनश्री खतकर, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : गारगोटी येथे माजी आमदार स्व. आनंदराव देसाई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना राहुल देसाई, डॉ. राजन गवस, प्रकाश वास्कर आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button