गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गारगोटी / सिंहवाणी ब्युरो :
गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, अंगणवाडीतील बालक, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच भरत शेटके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोरटे, राहुल चौगुले, सागर शिंदे, राहुल जाधव, संदीप देसाई, प्रशांत भोई, अनिता गुरव, संध्या कुपटे, लता चव्हाण, किरण कल्याणकर, स्मिता पिसे, रूपाली राऊत, पायल पावले, जितेंद्र भोसले, संजय गुरव, चंद्रकांत चव्हाण, दशरथ राऊत, सचिन पिसे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी विराज गणबावले यांच्यासह विद्या मंदिर सोनाळी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, अंगणवाडीतील विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देत गारगोटी ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला.