सौ.सुनीताताई मेघे यांचा पंढरपुर येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

ग्रामगीता तत्वज्ञान मंदिर पंढरपुर येथे दि.०८/०८/२०२६ रोज शनिवार ला गुरुदेव सेवा मंडळ बोरगांव मेघे वर्धा येथील उपासीका सौ.सुनीताताई विनायकराव मेघे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे माजी वर्धा प्रविभागीय अध्यक्ष तथा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या वर्धा चे माजी सचीव श्री विनायकराव मेघे यांच्या पत्नी यांना पद्मश्री फाउंडेशन नागपुर चे वतीने जीवनगौरव पुरस्काराने आचार्य श्री हरीभाऊजी वेरुळकर,ह.भ.प.लक्ष्मणदास काळे,ह.भ.प.साबळे महाराज श्रीमती श्रीदेवीताई साबळे,ग्रामगीताचार्य श्री शंकरराव मोहोड यांचे हस्ते सन्मानचीन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाला डॉ संजयजी आदमने,प्रकाशराव बाकरे,व्दारकाजी गिरडकर,अशोकराव महाजन, पुरुषोत्तमजी कुकडे,विनोदराव फुकट,मारोतराव टेकाम,शंकरराव होरे,सौ ताई आदमने,कु खोडणकर,सौ.कवीताताई फुकट आदी उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन वर्धा चे वतीने त्यांचे खुप खुप अभीनंदन