श्री मौनी विद्यापीठात डॉ. व्ही. टी. पाटील यांची १२६ वी जयंती साजरी

श्री मौनी विद्यापीठात डॉ. व्ही. टी. पाटील यांची १२६ वी जयंती साजरी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
श्री मौनी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांची १२६ वी जयंती विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठ आवारातील डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहकार भारतीचे भुदरगड तालुकाध्यक्ष प्रा. आनंद चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे, उपप्राचार्य सुनील जितकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोरटे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालये, शाळा तसेच विविध विद्या शाखांमध्येही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. कर्मवीर हिरे महाविद्यालयात डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रा. डॉ. युवराज देवाळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
फोटो ओळ : श्री मौनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन करताना चेअरमन मधुकर देसाई, आनंद चव्हाण, डॉ. अरविंद चौगले, डॉ. उदयकुमार शिंदे आदी.