मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसमत येथे ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण; नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसमत येथे ध्वजारोहण
स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण; नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
वसमत | सिंहवाणी ब्युरो
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसमत तालुक्यातील सुप्रसिद्ध शासकीय सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) ७९ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. वर्ग ‘अ’ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे पाल्य तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्मीभूत स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, तत्कालीन स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ, हुतात्मा गोविंद पानसरे आणि स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत व राज्यगीत घेण्यात आले.
यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त तथा सचिव सत्यविजय अन्वेकर, सहायक ग्रंथपाल माधवी पुजारी, शिवाजी दुधाने, अनिकेत पांडे, हरिभाऊ नाईकवाल, साहित्यिक प्रकाश अंभोरे, पांडुरंग कदम, बाळकृष्ण उभे, पी. बी. नादरे आदी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून “स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आजच्या आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी केले.