युवा नेते विक्रमसिंह आबिटकर यांच्या हस्ते करडवाडीत गौराईचे पूजन

युवा नेते विक्रमसिंह आबिटकर यांच्या हस्ते करडवाडीत गौराईचे पूजन
पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; हलगी-सनईच्या निनादात गौराईची मिरवणूक
सिंहवाणी ब्युरो / प्रकाश खतकर, करडवाडी
करडवाडी येथे गौरी-गणपती उत्सवानिमित्त गौराईचे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही महिला व युवतींचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत या सोहळ्याला भक्तिमय आणि मंगलमय स्वरूप प्राप्त करून दिले.
वेदगंगा नदीवरून गौराईचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी महिला शेळोली फाट्यावर एकत्र आल्या. साडी, दागिने व फुलांनी सजलेल्या महिलांनी हिरवळीने सजविलेले तांबे हातात घेऊन गौराईचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
यानंतर युवा नेते विक्रमसिंह आबिटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गौराईचे पूजन करण्यात आले. हलगी, सनई तसेच घोड्यांच्या सहभागामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. युवा नेते संदेश जाधव यांच्या नियोजनातून गौराईची वाजत-गाजत मिरवणूक गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली.
गौराईच्या आगमनाने करडवाडी परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. पारंपरिक वेशभूषेतील महिलांची उपस्थिती, भक्तिमय वातावरण आणि गावची जपलेली परंपरा यामुळे हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते संदेश जाधव यांनी केले.
यावेळी सरपंच विनोद कांबळे, विलास बेलेकर, प्रकाश बेलेकर, बाळासो बांदेकर, बजरंग सुतार, सुनील जाधव, शंकर निलजकर, मारुती बेलेकर, चंद्रकांत बेलेकर, युवराज घाटगे, सर्जेराव सोनाळकर, प्रकाश बुरुड, अजित खतकर, हिंदुराव पवार, शंकर बेलेकर, उत्तम खतकर, राहुल बांदेकर, साताप्पा बेलेकर, लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते.